बायोडाटा..!!
जीवाचा
आटापिटा
हाच त्यांचा
बायोडाटा..
चोचीत मिळण्या
तृणवत काडी
फ़िरवित पंख
रान पछाडी...
तृणकाड्यांची
गुंफ़ण करूनी
खोपा विणला
लक्ष धरूनी..
कोण ती विद्या?
गुरू कोणता?
घरटे बांधणे
शिकवित होता..
कसे उडावे
किती उडावे
कसे उमजले
कोणा ठावे..
करूनी फ़डफ़ड
प्रयास करणे
हव्यास धरणे
निरंतर धरणे..
गवसून घेतो
स्वंयेच वाटा
तोच त्यांचा
बायोडाटा...!!
गंगाधर मुटे
अल्पाक्षरी आणि अर्थगर्भ!!!
ReplyDeleteतुमचा ब्लॉग आजच माझ्या ब्लॉगसूचीत जोडला.
http://www.yekulkarni.blogspot.com
faar chhan ...
ReplyDeleteकविता मनापासून आवडली
ReplyDelete