मांसाहार जिंदाबाद ...!!
सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन गांडूळाच्या शेवया...!!
गोचीडाची खिचडी
टमगिर्याचं भरीतं
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीतं
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकून
घे पुरणात भराया .....!!
गोमाश्याचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
ऊंवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ....!!
कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जीभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरीबाला सूळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?....!!
गंगाधर मुटे
............................................
ही कविता प्रकाशीत करतांना मला खुप मानसिक त्रास झालाच.
आपल्या मनातील दुविधेपोटी कवितेची मुस्कटदाबी करायची नाही असे ठरवून प्रकाशीत केली.
मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?
या कवितेत "शाकाहार की मांसाहार" हा मुद्दा नाहीच. मुद्दा आहे मानवी वृत्तीचा.
अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हे महत्वाचे.
..............................................
chaan
ReplyDeleteकसल्या रेसिपी बनवल्यात हो ! तुम्ही सांगितलेली वर्णनं वाचून तोंडाला पाणी सुटलं आहे, कोंबडी बकरी खाऊन कंटाळलो होतो. नव्या रेसिपिज बद्दल थॅंक्स
ReplyDelete