वाघास दात नाही
गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.
फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.
रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.
खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही
अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.
..... गंगाधर मुटे ...
........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................
Chaan aahe...
ReplyDeleteराजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.
He tar khoop ch bhavale..
मैथीलीजी,सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
ReplyDelete