Monday 26 July, 2010

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्‍तिच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!

चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्‍तिच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!

जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्‍तिच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!

कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्‍तिच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्‍यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्‍तिच्या बैनमाय भलतंच झालं  ...... !!

                      गंगाधर मुटे
------------....--------------....----------...------------
------------....--------------....----------...------------
.

10 comments:

  1. सुंदर कविता.
    आजच्या परिस्थितीवर मार्मिक असे भाष्य या कवितेतून दिसून येते.
    एकून छानच!
    -भास्कर लोंढे

    ReplyDelete
  2. Great kawita.thanks
    --
    MANDAR KATRE

    ReplyDelete
  3. 'B E F I K E E R'27 July 2010 at 9:42 am

    Too good. Very TADKEDAAR!

    All the best.

    -'B E F I K E E R'

    ReplyDelete
  4. खुप दिवसांनी तुमची कविता वाचली. आवडली हे वेगळे सांगायला नकोच हो.... :)

    तुमचे लिखान वाचायला आवडते.

    Nikhil

    ReplyDelete
  5. Aanakhi Nagpuri kavita yeu dyaa !

    ReplyDelete
  6. नमस्कार काका,
    एकदम झकास तडका.. अगदी खरी परिस्थिती मांडलीत आपण.

    ReplyDelete
  7. "प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते..

    chhan aahe kavita ...
    aani ho nagpuree tadaka tar aahech ....

    ReplyDelete
  8. mute mahoday,
    kavita atishay sundar aahe, dhadakebaj aahe,Dolyat anajan ghalanaari aani nemaka varmavar bot thevanaari aahe.
    http://savadhan.wordpress.com
    NY-USA
    28 Juky 10
    dupari 2-07 vaajata

    ReplyDelete

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.