चंद्रवदना ...
मृदगंध पसरला, घुमली शीळ लाघवी ती
पळते खिदळत सर की, चंद्रवदना नवी ती?
रुतले सदैव काटे, गजर्यास गुंफताना
ती कमनशीब पुष्पे, वेणीस लाजवीती.
कित्येकदा झर्यांना, लाटा गिळून घेती
घेणार जन्म तेथे, कल्लोळ,यादवी ती.
बोलायचे तुला जे, ते बोल निश्चयाने
शंका कदाचित तुझी, असणार वाजवी ती.
छाया नरोत्तमाची, अभयास उब देते
त्यांचा उदो कशाला? जे कलह माजवीती.
..... गंगाधर मुटे ..
........................................................
वृत्त - गा गा ल गा ल गा गा X २
.......................................................
No comments:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.