Wednesday, 22 September, 2010

हिशेबाची माय मेली?

हिशेबाची माय मेली?

कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?

पुजारी पुसे एकमेकांस आता
नटी कोणती आज नावाजलेली?

तिला घाबरावे असे काय आहे
अशी काय ती तोफ़ लागून गेली?

किती नाडती आडदांडे तराजू
कशी रे हिशेबा, तुझी माय मेली?

कुणी हासला तो कळ्या कुस्करोनी
कशी दरवळावीत चंपा चमेली?

म्हणाले 'अभय' 'ते' तुरुंगात डांबू
''जरी आमुची तूच तक्रार केली..!''


                   गंगाधर मुटे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
(वृत्त - भुजंगप्रयात )

5 comments:

 1. छान कविता आहे. आवडली. आपण वर्‍हाडीत लेखन करावे.. वर्‍हाडाचे, तिथल्या लोकांचे जीवन जगासमोर आणावे ही माझी इच्छा आहे.आपल्या नागपुरी बोलीतल्या कविता मला आवडतात. घरच्या बोलीतल्या असल्याने जास्त जवळ वाटतात.

  ReplyDelete
 2. धन्यवाद संकेतजी. :)

  भौगोलिक प्रदेशानुसार आपल्या प्रांतिय भाषेत मला जे काही शक्य होते, तसे लिहिण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. आपल्या भावना पोचल्या. लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच अपेक्षा.

  ReplyDelete
 3. प्रिय गंगाधरजी,

  लेख वगैरे लिहिणं एकवेळ सोपं आहे हो! .... हे एवढं आतंरिक तुम्हाला कसे जमते ते कळत नाही .... हो! पण जे काही लिहिता ते खरेच मनाला खुप भावते .... एकून महीना सावरता-सावरता हिशेबाची माय कधी मेली ते कळतंच नाही .... असो ...! चालायाचेच हे सगळं .... तुम्ही हे जे काही लिहितायना .... ते वाचून .... मनाची आंदोलनं थांबता थांबत नाहित ..... !!!

  सस्नेह ....

  अनिरुद्ध

  ReplyDelete
 4. धन्यवाद अनिरुद्धजी.

  ReplyDelete
 5. Atishay Sundar... Gangadharji...hats Off..

  ReplyDelete

माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.