Saturday 11 September 2010
श्री गणराया
श्री गणराया
कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥
चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
व्दारी उभा मी नाम स्मराया ॥१॥
भवमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥
अनुष्ठान हे तव पुजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥
गंगाधर मुटे
..........................................
| आपला अभिप्राय.: |
Subscribe to:
Post Comments (Atom)

http://majhigani.blogspot.com/
ReplyDeleteह्या गीताची चाल वरच्या दुव्यावर ऐका.